Belagavi

गरिबीमुळे बालमजुरी करणाऱ्या मुलांना संरक्षण, शिक्षण देण्याची गरज : न्या. मुरली मोहन रेड्डी

Share

घरची परिस्थिती आणि गरिबीमुळे बालमजुरी करणाऱ्या मुलांना संरक्षण व शिक्षण देण्याची गरज आहे असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. मुरली मोहन रेड्डी यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा वकील संघ बेळगाव व कामगार विभाग यांच्या वतीने शहरातील कुमार गंधर्व कला मंदिरात जागतिक बालकामगार विरोधी दिन-2023 कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बालमजुरी प्रथा हद्दपार करण्यावर विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन करून बोलताना न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी म्हणाले की, काही ठिकाणी बालमजुरीला पाठीशी घालणारे पालक आहेत. त्यामुळे बालकामगार प्रथा बेकायदेशीर असल्याचे सांगण्यासाठी अधिकाधिक जनजागृतीचे कार्यक्रम व्हायला हवेत. काही हॉटेल, दुकानांमध्ये कमी किमतीत मजूर मिळावेत या हेतूने बालकांना या कामात गुंतवून ठेवले जाते. अशा घटना दिसल्यास नागरिकांनी त्वरित चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करून मुलांच्या संरक्षणासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.


जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी बालकामगार प्रथा हद्दपार करण्यासाठी योगदान देण्याची आणि बालकामगारांचे संरक्षण करण्याची शपथ उपस्थितांना दिली. त्यानंतर बालमजुरीतून बाहेर पडलेल्या एसएसएलसी आणि पीयूसीमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर धनादेशाचे वाटप करण्यात आले. फ्लो
बालकामगार संस्थेच्या प्रकल्प संचालिका ज्योती कांते यांनी प्रास्ताविक केले, कामगार विभाग अधिकारी तरन्नूम बंगाली यांनी आभार मानले.
बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य नियोजन संचालक गंगाधर, उप कामगार आयुक्त नागेश, डीडीपीआय बसवराज नलतवाड, गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: