Belagavi

वाढीव वीज बिलाविरोधात बेळगाव चेंबरचा एल्गार !

Share

औद्योगिक क्षेत्रातील वीजबिलात वाढ करण्याचा शासनाचा निर्णय सात दिवसांत मागे घ्यावा, अन्यथा हेस्कॉमच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स व अन्य संघटनांनी दिला आहे.

बेळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल म्हणाले की, राज्य सरकार ‘गृहज्योती’ या योजनेंतर्गत सर्व घरांना दरमहा 200 युनिट मोफत वीज पुरवत आहे, ही एक हमी योजना आहे. मात्र त्यासाठी औद्योगिक क्षेत्राचे वीज बिल वाढवणे योग्य नसल्याची तक्रार त्यांनी केली.


बेळगावात लघुउद्योग मुबलक प्रमाणात आहेत. त्यांना भरपूर वीज लागते. पण बेळगावचे लघुउद्योग मोठ्या प्रमाणात वीज बिल भरत आहेत. तशात वीजबिल वाढवले तर येथील उद्योग बंद होतील. अन्यथा शेजारच्या राज्यात स्थलांतराची परिस्थिती निर्माण होईल. सरकारने आमचा प्रश्न सोडवला नाही, तर तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असे ते म्हणाले.
औद्योगिक वसाहतीतील वीजबिल दरवाढीविरोधात मंगळवारी आंदोलन करण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. याकडे सरकारने लक्ष न दिल्यास राज्यव्यापी संघर्ष पुकारण्यात येईल, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला रोहन जुवळी, डॉक्टर राजशेखर आनंद देसाई, राम भंडारी, महादेव चौगुले, दयानंद नेतालकर आदी उपस्थित होते.

Tags: