बृहत व मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री तसेच विजापूर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते महिलांसाठी मोफत बसप्रवासाच्या शक्ती योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला.
विजापूर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आयोजित कार्यक्रमात विजापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजयमहांतेश दानम्मनवर यांच्यासह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. स्त्रीशक्ती योजनेला चालना दिल्यानंतर बोलताना, मंत्री एम बी पाटील म्हणाले की, राज्यातील महिलांना आजपासून सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. केवळ लक्झरी बसचे तिकीट घ्यावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड

मिळण्यापूर्वी ओळखपत्र दाखवून प्रवास करण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. सेवा सिंधू पोर्टलवर महिला स्मार्ट कार्डसाठी अर्ज करू शकतात, सरकारने महिलांना स्मार्ट कार्ड मिळण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली असल्याचे मंत्री पाटील म्हणाले. बाईट


Recent Comments