विजापूर जिल्ह्यात दुचाकी आणि टमटममध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार तर चारजण जखमी झाले.
विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी शहरातील गोलसंगीजवळ दुचाकी आणि टमटम यांच्यात झालेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी
पडलेल्या महिलेचे नाव समजू शकलेले नाही. तसेच या अपघातात चार महिला आणि एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निडगुंदी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments