एका 75 वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील नंदगडजवळील भुत्तेवाडी येथे उघडकीस आली आहे. या घटनेने नंदगड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नंदगडजवळील भुत्तेवाडी येथे 75 वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लक्ष्मण यल्लप्पा सुतार या व्यक्तीचा डोके ठेचून खून करण्यात आला आहे. तो गेली अनेक वर्षांपासून सुतारकाम करत असल्याची माहिती मिळाली आहे. या वृद्धाचा खून कोणी केला, कशासाठी केला याबाबत
अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वृद्धाच्या मारेकऱ्यांचा मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी सापळा रचला आहे.


Recent Comments