Mysore

बेळगावमध्ये ‘गृहलक्ष्मी’ म्हैसूरमध्ये ‘अन्नभाग्य’ला देणार चालना : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

म्हैसूर जिल्ह्यात अन्नभाग्य योजना आणि बेळगाव जिल्ह्यात गृहलक्ष्मी योजनेला लवकरच चालना देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

नंजनगुड्ड तालुक्यातील सुत्तुर हेलिपॅडवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, म्हैसूर जिल्ह्यात अन्नभाग्य योजना आणि बेळगाव जिल्ह्यात गृहलक्ष्मी योजना लवकरच सुरू केली जाईल. महिलांना बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी उद्या आम्ही ‘शक्ती’ योजना सुरू करणार आहोत.

राज्यात उद्यापासून महिलांना मोफत प्रवासाची परवानगी मिळणार आहे. आम्ही म्हैसूर जिल्ह्यात अन्नभाग्य योजना सुरू करणार आहोत. बेळगाव जिल्ह्यात गृहलक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पाणीटंचाई निवारणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

वरुणाला तालुका केंद्र बनवण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले की, वरुणाचे लोक तालुका केंद्र बनवण्यास सांगतील तर आम्ही ते करू. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जे बोलतात ते करत नाहीत. भाजपने वरुणाचा तालुका बनवणार असल्याचे सांगितले होते. भाजपने सत्तेत असताना विकासकामे केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या पहिल्यांदाच त्यांच्या वरुणा मतदारसंघात गेले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृतज्ञता सभेचे आयोजन केले होते. मतदारसंघात त्यांना विजयी करून मुख्यमंत्री केले, त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भव्य भोजनावळीचे आयोजन केले.

Tags: