Belagavi

गजराजांचा कळप पाहून दुचाकीस्वारांची झाली पळता भुई थोडी !

Share

आपल्याच थाटात अन रुबाबात जंगलात मिरवणाऱ्या गजराजांचा एकापाठोपाठ एक डौलदार पावले टाकत येणारा रस्त्याच्या मधोमधला कळप आणि त्यापासून हाकेच्या अंतरावर अडकून पडलेले दुचाकीवरील दोघे, हत्तींना पाहून त्यांना पळता भुई थोडी होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

होय, ही घटना नागरगाळी रोडवर घडल्याचे सांगण्यात येत आहे. नागरगाळी-दांडेली रोडवर घडलेली ही घटना आहे. जंगली हत्तीचं कळप येत असतानाच रस्त्यावरून दुचाकीस्वार येत आहेत. एवढ्यात त्यांना कळप दिसतो आणि ते त्यांची दुचाकी सोडून पळून जात असल्याची दृश्ये या व्हिडीओमध्ये चित्रित झाली आहेत.

https://www.facebook.com/reel/213410134913400?sfnsn=wiwspmo&s=F5x8gs&fs=e&mibextid=fazHQh

या व्हिडिओमध्ये गजराज त्यांच्याकडे संशयास्पदरित्या बघताना आढळून आले आहे. मोठा चित्कार करत, त्याची गर्जना चालू ठेवून तो कळप आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेला.

Tags: