नम्रपणे फोन घेत, नमस्कार, मी जिल्हाधिकारी, एसपी, डीसीपी बोलतोय, तुमची समस्या काय आहे ते सांगा असे विचारत अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लोकांच्या समस्या ऐकल्या. 13 व्या फोन-इन कार्यक्रमात जनतेचे तब्बल 790 फोनकॉल्स आले आणि अधिकाऱ्यांनी त्यांना तत्परतेने उत्तरे देत त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस अधीक्षक डॉक्टर संजीव पाटील यांच्या टीमने आयोजित केलेल्या 13 व्या फोन-इन कार्यक्रमात, जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि बेळगाव शहर पोलिस विभागाचे डीसीपी शेखर एच टी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी या कार्यक्रमात जिल्ह्यातील लोकांनी फोन करून त्यांच्या समस्या सांगितल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यावर उपाय शोधले. फ्लो
शहरातील एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, महानगरपालिकेने बांधलेल्या समुदाय भवनामुळे लोकांना त्रास होत आहे. याबाबत कार्यवाही करावी, अशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी, पालिका आयुक्त येथे असून, त्यांना कळवून कारवाई केली जाईल, असे सांगितले.
अथणी तालुक्यातील एका व्यक्तीने जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांना फोन करून तक्रार केली की, अथणीच्या काही भागात चार जण दारूची अवैध विक्री करत आहेत. त्यावर उत्तर देताना एसपींनी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करा, त्यांना तत्काळ अटक करणार असल्याचे सांगितले.
अथणी तालुक्यातील हनुमापूर गावातील मळ्यातील रस्ता शाळेकडे जातो. नवीन नकाशात रस्ता नसल्याचे दिसून आले. तो रस्ता आता जागेच्या मालकाने बंद केल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी, रस्ता नकाशावर आहे की नाही, याची तपासणी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. बाईट.
बेळगावच्या टिळकवाडीतील कलामंदिरात प्रतिबंधात्मक आदेश असतानाही स्मार्ट सिटी कंपनीने काम सुरू केले केल्याची तक्रार एकाने केली. त्यावर कोर्टाचा आदेश पालन करण्याचे स्मार्ट सिटीला सांगण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
धारवाड जिल्ह्यातील एका वकिलाने फोन करून सांगितले की, अथणी महिला सहकारी संस्थेसह दोन्ही सोसायट्या जमा केलेले पैसे परत करत नाहीत. त्यामुळे ठेवीदारांना खूप त्रास होत आहे. आम्हाला आमचे पैसे परत करण्याची विनंती केली. त्याला उत्तर देताना एसपी संजीव पाटील म्हणाले की, तुमची समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल.
सौंदत्ती तालुक्यात 2021 व 2022 मध्ये कंत्राटी तत्वावर पौरकार्मीकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांना पीएफ देत नसल्याची तक्रार केली. त्यावर उत्तर देताना एसपी संजीव पाटील यांनी संबंधितांना माहिती देऊन समस्या सोडविण्यात येईल, असे सांगितले.
बेळगाव तालुक्यातील नावगे येथे दसऱ्याच्या दिवशी आमच्या मुलीची हत्या झाली, याबाबत मारिहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्याप तपास केला जात नाही अशी तक्रार एका व्यक्तीने फोन करून केली. याला उत्तर देताना डीसीपी शेखर एसटी यांनी मारिहाळ सीपीआय आणि पीएसआय यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले. बाईट.
देणगीच्या नावाखाली विनाकारण अवाजवी डोनेशन घेणाऱ्या अथणी तालुक्यातील खासगी शैक्षणिक संस्थांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने केली. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पालकांनी आधी येऊन तक्रार केल्यास चौकशी करून संबंधित शैक्षणिक संस्थेवर मुलाहिजा न राखता कारवाई करू, असे सांगितले. बाईट.
रायबाग तालुक्यातील मोरब गावातील एका व्यक्तीने यूट्यूब चॅनलच्या नावावर दावा करून लोकांना फोन करून त्रास दिला आहे. तसेच व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार एकाने केली. याला उत्तर देताना एसपी संजीव पाटील म्हणाले की, संबंधितांचे नाव सांगून तक्रार दिल्यास यूट्यूब चॅनलचे नाव सांगून आणि ब्लॅकमेल करून जनतेला त्रास दिल्यास अशा व्यक्तीवर कारवाई केली जाईल.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्यावतीने राबविण्यात येणारा फोन-इन कार्यक्रम राज्यासाठी आदर्श आहे. या 13व्या फोन-इन कार्यक्रमात तब्बल 790 कॉल्स आले. उत्पादन शुल्क विभागाची समस्या जवळपास खूप ऐकली आहे. त्यावर पुढील कार्यक्रमात चर्चा केली जाईल. असे कार्यक्रम केल्यास जनतेच्या समस्या ऐकून घेण्यास मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केले. फ्लो.
महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर, महादेव एस एम, बाळाप्पा तळवार, विठ्ठल मादार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी व शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आजच्या फोन-इन कार्यक्रमात जनतेने शहरातील वाहतूक समस्या, जिल्ह्यातील अवैध धंदे, कौटुंबिक कलह, तालुक्यातील स्मशानभूमीची समस्या यासह विविध समस्या मांडल्या आणि लोकांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील आणि डीसीपी यांना फोन केला. शहर पोलीस विभागाकडे तक्रार करून समस्येवर तोडगा काढला.
Recent Comments