विजापूर शिक्षण विभागात खुर्चीसाठी दोन अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याची घटना विजापूर शहरात घडली आहे.
विजापूरच्या डीडीपीआय कार्यालयात गुरुवारी दोन अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याची घटना घडली. डीडीपीआय पदाच्या खुर्चीसाठी उमेश शिरहट्टीमठ आणि युवराज नाईक या दोन अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. सध्या उमेश शिरहट्टीमठ यांना डीडीपीआय पदावरून संयुक्त संचालक म्हणून बढती देण्यात आली आहे.
मात्र 30 जूनपर्यंत आपण त्याच ठिकाणी सुरू राहणार असल्याची माहिती डीडीपीआय उमेश शिरहट्टीमठ यांनी दिली आहे. त्यांच्याजागी सरकारने कुडलिगीचे गट शिक्षणाधिकारी युवराज नायक यांना विजापूरचे डीडीपीआय म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी युवराज नायक समर्थकांसह पदभार स्वीकारण्यासाठी आले. मात्र त्यावेळी दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे डीडीपीआय कोण, याबाबत डीडीपीआय कार्यालयात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर डीडीपीआय कोण याचा निर्णय शासनस्तरावर घ्यावा असे युवराज नायक यांनी म्हटले आहे.
एकंदर दोन अधिकाऱ्यांमधील खुर्चीच्या या संघर्षाने विजापूर डीडीपीआय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच करमणूक झाली.
Recent Comments