Belagavi

सुप्रसिद्ध आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सची आता बेळगावात शाखा

Share

दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात हर्बल हॉस्पिटलची साखळी चालविणाऱ्या आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सची शाखा बेळगावात सुरु करण्यात आली आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील अग्निशामक दल ठाण्यासमोर स्थापन केलेल्या या आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सच्या शाखेचे आज शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.

तमिळनाडूतील चेन्नईत 110 वर्षांपूर्वी लावलेल्या आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सच्या छोट्या रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तमिळनाडू, तेलंगणा, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्रात शाखा असलेल्या आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सच्या बेळगावातील पहिल्या आणि कर्नाटकातील सातव्या शाखेचे आज शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले. तमिळनाडूचे माजी लोकसभा सदस्य आणि हॉस्पिटल्सचे एमडी एस आर जयरोर यांनी हॉस्पिटलचे उद्घाटन केले.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सचे एमडी एस आर जयरोर यांनी सांगितले की, आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सच्या तमिळनाडू, तेलंगणा, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 250 हुन अधिक शाखा आहेत. वनौषधी उपचारांचा आमचा चार पिढ्यांचा दीर्घ अनुभव आहे. सर्व शाळांमध्ये कुशल व तज्ज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफ आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर अमेरिका, श्रीलंका, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया आदी परदेशातील नागरिकही उपचारांसाठी आमच्याकडे येतात. विविध प्रकारच्या आजारांवर, रोगांवर आमच्याकडे प्रभावी, परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत. बेळगावकरांना आम्ही उत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या हेतूने कार्यरत राहणार आहोत असे त्यांनी सांगितले.

बेळगाव शाखेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता यांनी सांगितले की, आरजेआर हर्बल हॉस्पिटल्सची स्थापना 110 वर्षांपूर्वी चेन्नई येथे करण्यात आली. प्रभावी उपचार आणि रुग्णांचा विश्वास याच्या बळावर आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे. आमच्याकडे सोरायसिस, मधुमेह, पाय व गुडघा दुखणे, दमा, मानदुखी, पाठदुखी, केस गळणे, पांढरे डाग, पीसीओडी, सतत डोकेदुखी यासह लठ्ठपणाच्या समस्यांसाठी हर्बल औषधे आहेत. कर्नाटकच्या विविध भागांत आधीपासून 6 शाखा असलेल्या आरजेआर हॉस्पिटलने आता आपली 7वी शाखा बेळगावमध्ये सुरू केली आहे.


एकंदर, हर्बल औषधोपचारांवर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांसाठी बेळगावात आरजेआर हॉस्पिटलची शाखा सुरु झाली आहे. त्याचा बेळगावकरांना लाभ व्हावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.

Tags: