Belagavi

रस्त्यांच्या विकासासाठी 72 कोटींचा निधी द्या : आ. विठ्ठल हलगेकर

Share

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 72 कोटींचा निधी देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली.

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन मंत्री जारकीहोळी याना दिले.


खानापूर तालुक्यात सार्वजनिक वाहतूक सुरळीत चालण्यासाठी खानापूर ते ताळगुप्प पर्यंतचा राज्य महामार्ग क्र. 93 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची मागणी निवेदनात केली आहे. तसेच तालुक्यातील 24 रस्त्यांसाठी 72 कोटींचे अनुदान मंजूर करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देऊन केली. यावेळी भाजप नेते व महालक्ष्मी लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, बसवराज सानिकोप्प, वकील सुरेश भोसले श्रीकांत इटगी, सुनील मड्डीमनी, निलजकर आदी उपस्थित होते.

Tags: