न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देताना बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रभू यत्नट्टी यांनी सांगितले की, बेळगावातील रामतीर्थ नगर, एच. डी. कुमारस्वामी लेआऊट आणि चन्नम्मा नगर येथील बुडाच्या मालकीच्या खुला जागांच्या विक्रीसाठी
इ-ऑक्शन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. अनेकांनी त्यासाठी अर्जही केले. मात्र ऑनलाईन लिलाव करण्याऐवजी अचानक होळी सणाच्या सुटीच्या दिवशी मॅन्युअल ऑक्शन करून कमी किंमतीत भूखंड हस्तांतरित करण्यात आले. यात 100 ते 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, सरकारचे नुकसान झाले आहे.
बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्या पुढाकाराने हा घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी करावी म्हणून राजू टोपन्नावर यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. पण त्याची दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे त्यांनी ऍडव्होकेट नितीन बोळगुंडी यांच्यामार्फत चौथ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने बुडा आयुक्तांवर एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले


Recent Comments