Belagavi

खानापूर तालुक्यात पुरेशा बस, डेपो सुरु करा : आ. विठ्ठल हलगेकर

Share

खानापूर तालुक्यातील बसेसचा तुटवडा दूर करून विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी जादा बसेसची व्यवस्था करावी, नवीन बसडेपो सुरु करावेत अशी मागणी खानापूरचे आ. विठ्ठल हलगेकर यांनी परिवहनमंत्री रामलिंग रेड्डी यांच्याकडे केली आहे.

खानापूर तालुक्याचा 80% भाग हा वनक्षेत्राने व्यापलेला असल्याने या ठिकाणाहून विद्यार्थ्यांची, शेतकर्‍यांची ये-जा करताना फार गैरसोय होते. त्यामुळे तालुक्याला अतिरिक्त 50 बसेसची व्यवस्था करण्यात यावी. तसेच नंदगड, बिडी, जांबोटी सर्कल येथे नवीन बस डेपोची व्यवस्था करण्यात यावी या मागणीचे निवेदन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांना दिले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मंत्री महोदयांना पुष्पगुच्छ देऊन, शाल पांघरून त्यांचा सत्कार केला. यावेळी महालक्ष्मी लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, भाजप तालुका प्रधान सचिव बसवराज सानिकोप्प, वकील सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

Tags: