राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगावातील एपीएमसी होलसेल भाजी मार्केटमध्ये नव्याने बांधलेली दुकाने व भाजीबाजार पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी नेते व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत गणशांती होम व नवग्रह पूजन करण्यात आले.


बेळगावच्या एपीएमसीत 134 दुकाने असून आणखी 48 बांधण्यात आली आहेत. यानिमित्त शेतकरी नेते व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत विधिपूर्वक गणशांती होम व नवग्रह पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी नेते सिद्दगौडा मोदगी म्हणाले की, नवीन सरकारकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत. येत्या अधिवेशनात वादग्रस्त कृषी उत्पादन बाजार कायदा मागे घेण्यास सरकार पावले उचलेल अशी अपेक्षा आहे. बेळगाव एपीएमसीत 134 दुकाने आहेत आणि आणखी 48 दुकाने बांधली आहेत. बाजारात अन्याय होत असल्यास शेतकरी सरकारकडे अर्ज करू शकतात. काँग्रेसकडून आश्वासने पाळली जातात, असे ते म्हणाले.

एपीएमसीमधील व्यापारी सतीश पाटील म्हणाले की, मार्केट बांधून जवळपास 5 वर्षे झाली आहेत. आज गणहोम व नवग्रह शांती पूजन करण्यात आले. गेल्या 2 वर्षात नवीन दुकाने सुरू झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची सोय होईल. रास्त भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट.
यावेळी व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत शेतकरी नेत्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, राघवेंद्र नाईक, राजू टोपन्नावर, शिवलीला मिसाळे, तसेच शेतकरी नेते एपीएमसीचे व्यापारी आदी उपस्थित होते.


Recent Comments