चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांचे खुल्या वाहनातुन पुष्पवृष्टी करत भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.

सेवानिवृत्त सैनिक रावसाहेब लगडे व संतोष पुजारी यांचे मांजरी, मांजरीवाडी गावातील सेवानिवृत्त सैनिक व ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. नवीन बसस्थानकावरून निवृत्त सैनिकांचे खुल्या वाहनातून फुलांचा वर्षाव करत, फटाके फोडून व विविध वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फ्लो
यासंदर्भात बोलताना पीकेपीएसचे अध्यक्ष अण्णासाहेब यादव म्हणाले की, देशाची सेवा करणारे सैनिक अनेक संकटे सोसतात. अशा सैनिकांचे सर्वांनी कौतुक केले पाहिजे असे सांगितले. ग्रामपंचायत अध्यक्ष पांडुरंग माने म्हणाले की, देशाची प्रामाणिकपणे सेवा करणारे सैनिक आज आमच्या गावात निवृत्त होऊन आले आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी आता गावातील तरुणांना लष्करी प्रशिक्षण देऊन गावातील अधिकाधिक तरुणांना सैन्यात भरती करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे ते म्हणाले.
या संदर्भात माजी आमदार कल्लाप्पाना मगेनवर, शीतल यादव, दिलीप पवार, शशिकांत पाटोळे, संजय नांद्रे, सुरेश रेंदाळे, बाबू पाथरवट, विनोद तोरसे, संदीप रोडे, श्रीधार भोजकर, डॉक्टर जी बी माने, चंदू माने, रवी यादव, पांडुरंग यादव, मल्हारी यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Comments