Belagavi

बेळगांव तालुक्यातील एसएसएलसीच्या गुणवंतांचा सत्कार

Share

बेळगावातील कॅम्पमधील शानभाग हॉलमध्ये ‘मराठा एकता एक संघटन, बेळगांव’ या सामाजिक संघटनेकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगांव तालुक्यातील मराठी माध्यमिक विद्यालयातील 2022-23 च्या दहावीमधील प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुणी विध्यार्थ्यांचा गौरव सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा संघटन अध्यक्ष नारायण झंगरुचे होते. प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक रणजित चौगुले, प्रमुख पाहुणे बेळगांवच्या उपमहापौर सौ. रेश्मा प्रवीण पाटील, शाहीर व्यंकटेश देवगेकर, उद्योजक संदीप ओऊळकर, सारंग देसाई, गजानन मिसाळे, विठ्ठल वाघमोडे, सागर झंगरुचे, विजय तिप्पानाचे, गोपाळ पाटील, नारायण सांगावकर, अनिल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


श्री गणेश प्रतिमा पूजन उपमहापौर रेश्मा पाटील, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन गजानन मिसाळे, महात्मा जोतिबा प्रतिमा पूजन सारंग देसाई, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन विठ्ठल वाघमोडे, बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन नारायण सांगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, रणजित चौगुले, नारायण झंगरुचे यांनी विचार मांडले. त्यानंतर व्यंकटेश देवगेकर यांनी पोवाडे सादर केले.
स्वागत संघटन सचिव अमोल जाधव यांनी केले. परिचय राजकिरण नाईक, कल्लाप्पा पाटील यांनी करून दिला. प्रास्ताविक शिवाजी कंग्राळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी खंडागळे यांनी केले तर आभार निलेश शिंदे यांनी मानले.
यावेळी जे बी मुतगेकर, एस बी शेडबागी, विठ्ठल देसाई, केशव सांबरेकर, राहुल जाधव, काशी तारिहाळकर, कृष्णा नावगेकर, परशराम जाधव, ज्ञानेश्वर पाटील, हणमंत झंगरुचे, उमाजी मल्लाप्पा कनगुटकर, प्रभाकर, पाटील, कडोलकर, यल्लाप्पा मरुचे, कल्लाप्पा पाटील, गोपाळ पाटील, नामदेव डुकरे, यल्लाप्पा गुरव, मुरारी पाटील, जे के जाधव, रितेश जाधव, बबन भोबे, गजानन धामणेकर, राजू कंग्राळकर, विजय चौगुले यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विध्यार्थी उपस्थित होते.

Tags: