काँग्रेस पक्ष कपटी असल्याचा आरोप हुक्केरीचे भाजप आमदार निखिल कत्ती यांनी केल्यानंतर चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष शानुल तहसीलदार यांनी तातडीने त्याचा निषेध करून आमदारांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला.


हुक्केरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शानुल तहसीलदार यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा कपटी आहे, असा आरोप आमदारांनी केलाय. जर काँग्रेस पक्ष कपटी असता तर राज्यातील जनतेने त्याला सत्ता दिली असती का, हे त्यांनी तपासावे. दरवाढीने सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या भाजपला जनतेने नाकारत योग्य धडा शिकवलाय. आता अशा प्रकारे देशात बदल घडवून आगामी लोकसभा निवडणुकीतही कपटी भाजपवर जनता बहिष्कार टाकणार आहे असे त्यांनी सांगितले. बाईट.


Recent Comments