Accident

बेळगावातील कॅम्पमधील स्क्रॅप गोदामाला आग

Share

बेळगावातील कॅम्प परिसरातील शांतेशा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या स्क्रॅप गोदामाला आग लागून सुमारे दहा हजाराचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

बेळगावातील कॅम्प परिसरात शांतेशा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वर्कशॉप आणि गोदाम आहे. या गोदामाला आज, सोमवारी सकाळी 9.45 च्या सुमाराला अचानक आग लागली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.


या संदर्भात माहिती देताना शांतेशा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वर्कशॉप मॅनेजर बसवराज यांनी सांगितले की, आज सकाळी सुमारे 9.45 च्या सुमाराला स्क्रॅप गोदामाला अचानक आग लागली. आम्ही तातडीने अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या आगीत सुदैवाने प्राणहानी झाली नाही, तसेच किरकोळ नुकसान झाले आहे. सुमारे दहा हजारांचे साहित्य आगीत नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. बाईट
अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी सांगितले की, आज सकाळी आम्हाला याठिकाणी आग लागल्याचा फोन आला. आम्ही येऊन तातडीने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत वेस्टेज मटेरियल जळाले आहे. कोणीही जखमी झालेले नाही.
दरम्यान, कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags: