PRESS CONFERENCE

खबरदार… भडकावू बोलाल तर तुरुंगात टाकू : एम. बी. पाटील यांचा सुलिबेले यांना इशारा

Share

खबरदार… भडकावू बोलाल तर तुरुंगात टाकू असा इशारा मंत्री एम बी पाटील यांनी चक्रवर्ती सुलिबेले यांना दिला आहे.
राज्यात काँग्रेस सरकार आल्यानंतर हिटलरचे सरकार आल्याचे विधान चक्रवर्ती सुलिबेले यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत मंत्री एम बी पाटील यांनी सुलिबेले यांना इशारा दिला आहे. काँग्रेस सरकारची हिटलर सरकारशी तुलना करणाऱ्या सुलिबेले यांचा मंत्री एम बी पाटील यांनी क्लास घेतला. गेल्या चार वर्षात सुलिबेलेने काय केले, असा सवाल करत सुलिबेलेनी चार वर्षात अनेक उपद्व्याप केले. त्यांनी केलेल्या चुका आम्ही दुरुस्त करत आहोत. पाठ्यपुस्तक, हिजाब, हलाल, अज़ान अशी अनेक नाटके त्यांनी केली. भविष्यात असे नाटक केले तर तुरुंगात जावे लागेल असे सांगत मंत्री एम.बी.पाटील यांनी सुलिबेले यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला. बाइट : एम.बी.पाटील, मंत्री.

Tags: