बेळगावातील महांतेशनगरात ग्रीन सेव्हियर, बेळगाव महापालिका आणि भाऊराव काकतकर कॉलेज एनएसएस विभागातर्फे पर्यावरण दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आ. सेठ वृक्षारोपण करून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सिमेंट काँक्रिटच्या जंगलात एखादे उद्यान किंवा झाडीत दिसणारी हिरवळ पाहून डोळ्यांनाच नव्हे तर मनालाही सुखद अनुभव मिळतो. त्यामुळे शहरात हिरवळ निर्माण करणे गरजेचे आहे. गेल्या 5 वर्षांत बेळगाव शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. ती सुधारण्याची गरज आहे. अशा उपक्रमांतून बेळगाव शहर स्वच्छ, हरित आणि सुंदर करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिकांनीही वृक्षारोपण केलेल्या रोपांची पाणी घालून, काळजी घेऊन आपला परिसर हिरवागार करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. बेळगाव हरित, सुंदर होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू असे आवाहन आ. सेठ यांनी केले.
यावेळी बोलताना ग्रीन सेव्हियरचे संस्थापक समीर मजली म्हणाले की, आमच्या संस्थेतर्फे दर रविवारी हरित परिसर करण्याच्या हेतूने श्रमदान मोहिमेतून वृक्षारोपणाची चळवळ सुरु केली आहे. हा आमचा 370वा रविवार आहे. गेल्या 40 वर्षांत बेळगाव शहर, खानापूर आणि जिल्ह्यात वनसंपदेची मोठ्या प्रमाणात तोड होऊन नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी खानापूर तालुक्यात किमान एक कोटी आणि बेळगाव शहर-परिसरात किमान दोन लाख झाडे लावण्याची, त्यांचे जतन करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही आता बेळगाव महापालिकेच्या सहयोगाने वृक्षारोपण अभियान चालवले आहे. नागरिकांनी ग्रीन सेव्हियरचे सदस्य होऊन वनसंपदा रक्षणाच्या कामात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आ. राजू सेठ, पालिका आयुक्त रुदेश घाळी आदींच्याहस्ते रोपे लावण्यात आली. यावेळी पालिका उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, नगरसेविका लक्ष्मी राठोड, बी. के. कॉलेजचे शुभम चव्हाण यांच्यासह स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments