देशाच्या रक्षणासाठी प्रशिक्षण काळात मिळालेल्या प्रशिक्षणाच्या बळावर क्षितिजाला गवसणी घाला, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठेने देशाची सेवा करा आहे आवाहन हवाईदलाच्या प्रशिक्षण विभागाचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल आर. राधीश यांनी केले.
बेळगावातील सांबरा येथील हवाई दलाच्या प्रशिक्षण तळावर आज प्रशिक्षणप्राप्त बेळगावात 2675 अग्नीविरवायूंच्या पहिल्या शानदार दीक्षांत समारंभात हवाईदलात समावेश करण्यात आला. त्यावेळी प्रशिक्षणप्राप्त जवानांना उद्देशून ते बोलत होते. एअर मार्शल राधीश पुढे म्हणाले की, भारतीय हवाई दल आज आपल्या कार्यप्रणालीत महत्वाचे बदल घडवून आणत उत्तुंग मनोधैर्य असणाऱ्या संरक्षण दलामध्ये स्वतःला परिवर्तित करत आहे.
या पार्श्वभूमीवर आपल्या जवानांना कठोर प्रशिक्षण देण्याची हवाईदलाच्या योजना आहे. त्यानुसार भरती झालेल्या जवानांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बेळगाव हवाईदल प्रशिक्षण तळ देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण तळांपैकी एक आहे. येथे मिळालेल्या प्रशिक्षणाचा अग्नीविरवायूंना संपूर्ण सेवाकाळात उपयोग होईल. या प्रशिक्षणाच्या आधारावर देशरक्षणासाठी क्षितिजाला गवसणी घाला असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी प्रशिक्षणप्राप्त अग्नीविरवायूंनी ड्रिल, टेंट पिचिंग आदी शानदार प्रात्यक्षिके सादर केली. रायफल्स हवेत उडवणे, रायफल्सच्या आधारे चक्ररचना आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. फ्लो.
प्रशिक्षण काळात विविध विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या प्रशिक्षणप्राप्त अग्नीविरवायूंना एअर मार्शल आर. राधीश यांच्याहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षणप्राप्त

एकूण 2675 अग्नीविरवायूंना यावेळी भारतीय हवाई दलात समाविष्ट करून घेण्यात आले. यावेळी अग्नीविरवायूंनी हवाईदलाचा ध्वज आणि राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून कर्तव्य आणि देशरक्षणाची शपथ घेतली. समारंभाला हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Recent Comments