मिरजेत अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचार करुन गळा कापला गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाचे कृत्य


सांगलीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला मिरजेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा चिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. या प्रकरणी मिरजेतील तरुणाविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
प्रसाद मोतुगडे माळी (वय 20 वर्षे, राहणार ब्राह्मणपुरी मिरज) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपीने पीडित मुलीचं रिक्षातून अपहरण केलं. त्यानंतर तिला मिरजमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत तिला घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार करुन तिलाच्या गळ्यावर कटरने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गांजाच्या नशेत हे कृत्य केल्याचं समजतं.
दरम्यान आरोपीने केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या उजव्या हाताची नस कापल्याचं देखील कळतं. तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मिरज शहर पोलिसात आरोपी प्रसाद मोतुगडे माळी याच्याविरोधात अपहरण, पॉक्सो, ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करत आहेत.


Recent Comments