Banglore

ओडिशा रेल्वे दुर्घटना दुःखदायक; दोषींवर कारवाई व्हावी : सिद्दरामय्या

Share

ओडिशा रेल्वे दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. यातील मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना मी देवाकडे करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दिली. दुर्घटनेत कर्नाटकातील कोणी अडकले का याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ती घेण्यासाठी कामगार मंत्री संतोष लाड यांना भुवनेश्वरला पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी तीन रेल्वे ट्रेन्सची एकमेकांना धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीनशेहून अधिक बळी गेले आहेत, ही दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखदायक आहे अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दिलीय. या दुर्घटनेत कर्नाटकचे कोणी अडकलेत का याबाबत माहिती मिळालेली नाही. आम्ही ओडिशा सरकारच्या संपर्कात आहोत. त्याशिवाय याबाबत माहिती घेण्यासाठी कामगार मंत्री संतोष लाड

यांना विशेष विमानाने भुवनेश्वरला पाठवले आहे. तेथे जाऊन मंत्री लाड माहिती घेऊन आम्हाला कळवणार आहेत. गेल्या अनेक वर्षांत एवढी मोठी दुर्घटना झाली नव्हती. ही खूप दुःखद घटना आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना मी देवाकडे करतो. यातील दोषींवर रेल्वे खात्याने कारवाई करावी अशी मागणी सिद्दरामय्या यांनी केली.

एकंदर, रेल्व्हे दुर्घटना खूप दुःखद आहे, कर्नाटकातील प्रवाशांची माहिती घेण्यासाठी मंत्री संतोष लाड यांना ओडिशाला पाठवले असल्याचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी म्हटले आहे.

Tags: