बेळगावातील वडगाव येथे नारीशक्ती महिला मंडळाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला.वडगाव येथील संभाजीनगरातील रणझुंजार कॉलनी येथे नारीशक्ती महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी समाजसेविका सुनीता जाधव-सुभेदार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा सडेकर अध्यक्षस्थानी होत्या.

यावेळी एसएसएलसी परीक्षेत ८५% गुण मिळवलेल्या सप्तक पोतदार या विद्यार्थ्याचा पाहुण्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्राची पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. सोनिया अनवेकर यांनी प्रास्ताविक केले. संपदा बांदिवडेकर यांनी परिचय करून दिला. रमा पोटे यांनी आभार मानले. यावेळी स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments