Belagavi

“गॅरंटी” ची पुरेशी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

Share

“गॅरंटी” ची पुरेशी अंमलबजावणी; संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

गृहलक्ष्मी, युवानिधी आणि अन्नभाग यांसह पाच ‘हमी’ लागू करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्याची पुरेशी अंमलबजावणी करावी, लाभार्थ्यांची ओळख पटवावी आणि जिल्ह्यातील संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व तयारी करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पूर व्यवस्थापन व विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात शनिवारी (३ जून) झालेल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सरकारच्या योजना पूर्णतः अमलात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन काम करावे अशी सूचना त्यांनी केली.

Tags: