Banglore

कर्नाटकाला 5 टीएमसी पाणी सोडा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची महाराष्ट्राला विनंती

Share

उत्तर कर्नाटकातील 6 जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामुळे 5 टीएमसी पिण्याचे पाणी सोडण्याची विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला पत्र लिहून केली आहे.


सिद्धरामय्या यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे की, बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी, रायचूर या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने लोक आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कृष्णा आणि भीमा नद्यांमध्ये एकूण पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशा विनंतीचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.
पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्याने कृष्णा आणि भीमा नद्यांमध्ये प्रत्येकी तीन टीएमसी पाणी सोडण्यासाठी यापूर्वी पत्र दिले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. पत्रात त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून पाणी सोडावे, अशी विनंती केली आहे.
यापूर्वी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कर्नाटक सरकारने 6 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली होती, महाराष्ट्र सरकारने कृष्णा नदीत 1 टीएमसी पाणी सोडले होते. यावेळी वाढत्या उन्हाळ्यामुळे कोयना आणि वारणामधून 2 टीएमसी पाणी सोडण्यात आले. महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून कृष्णा नदीत 2 टीएमसी आणि भीमा नदीत 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती पत्र लिहून केली आहे. कमी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याची पातळी कमी होऊन लोक व पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे.

Tags: