कर्नाटकच्या मतदारांना दिलेली पाचही आश्वासने काँग्रेस अंमलात आणेल, चालू आर्थिक वर्षातच काँग्रेसच्या पाचही निवडणूक हमींची अंमलबजावणी केली जाईल. सर्व वचने कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा भेदभाव न करता पूर्ण केली जातील अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी केली.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, पाचही आम्ही आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आम्ही सर्व पाच आश्वासनांवर सखोल चर्चा केली. आम्ही ठरवले आहे की सर्व पाच हमी चालू आर्थिक वर्षात लागू केल्या जातील, असे ते म्हणाले.
गृहज्योतीची पहिली हमी आम्ही दिली. आम्ही प्रत्येकाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या घरासाठी 12 महिन्यांच्या सरासरीच्या आधारे मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. वापरलेल्या सरासरीपेक्षा 10% अतिरिक्त युनिट विनामूल्य आहे आणि ते 200 युनिट्सच्या आत असल्यास ते विनामूल्य आहे. 1 जुलै ते ऑगस्टअखेर जी वीज वापराल ती मोफत आहे. मात्र त्यापूर्वीचे वीज बिल ग्राहकांनी भरायचे आहे. दरमहा या पद्धतीने मोफत वीज राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. बाईट
मुख्यमंत्री सिद्दरामय्या म्हणाले की, काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच हमींपैकी, “गृह लक्ष्मी” गॅरंटीची अमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 15 जून ते 15 जुलै दरम्यान बँक खात्याचे तपशील आणि आधार कार्ड कुटुंबातील महिलांनी सादर केले पाहिजेत. या हमी अंतर्गत कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा 2000 रुपये मिळतील. प्रत्येक कुटुंब ठरवेल की त्यांचे प्रमुख कोण असेल. ‘गृह लक्ष्मी’ एपीएल आणि बीपीएल कार्ड दोन्ही महिलांना लागू आहे. यासाठी कोणत्याही अतिरिक्त अटी नाहीत. अर्ज ऑनलाइन सादर करता येईल. सॉफ्टवेअरही विकसित करणे आवश्यक असल्याने हा प्रकल्प तातडीने राबविला जाणार नाही, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. बाईट
सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अन्नभाग्य योजनाही राबवण्यात येईल. यात 10 किलो तांदूळ मोफत देण्यात येतील. १ जुलैपासून आम्ही सर्व बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना दिलेले वचन पूर्ण करू. १ जुलैपासून आम्ही योजना राबवू. या महिन्यात ही योजना लागू करणे शक्य नाही, म्हणून आम्ही पुढील महिन्याच्या १ तारखेपासून सर्व बीपीएल, अंत्योदय योजना प्रत्येकी १० किलो तांदूळ लागू करणार आहोत असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. बाईट
सिद्धरामय्या म्हणाले की, आम्ही सर्व महिलांना परिवहन मंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करू देण्याचे आमचे वचन पूर्ण करू. या महिन्याच्या 11 तारखेपासून ही योजना विद्यार्थिनींसह महिलाना लागू करण्यात येणार आहे. ही योजना फक्त कर्नाटक राज्यात मर्यादित आहे. तुम्ही बेंगळूर ते कोलार, बिदर, बेळगाव इत्यादी ठिकाणी राज्यात कुठेही प्रवास करू शकता.
एसी व्यतिरिक्त, तुम्ही एक्स्प्रेस बसमधून प्रवास करू शकता. बेंगळुरूहून तिरुपती आणि हैदराबादला जाणे शक्य नाही. एसी आणि लक्झरी बसेस वगळता, 94% बसेसमध्ये, कोणतीही महिला कोणत्याही अटीशिवाय आणि कोणत्याही बस शुल्काशिवाय कुठेही प्रवास करू शकते. ही योजना बेंगळुरूमध्ये 11 जूनपासून लागू होणार आहे. बीएमटीसी बसमध्ये महिलांना आरक्षण राहणार नाही असे त्यांनी सांगितले. बाईट.
युवानिधी योजनेलाही मंत्रिमंड्ळाने मंजुरी दिल्याचे सांगून सिद्दरामय्या म्हणाले की, 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व बीए, बीएससी अशा सर्व पदवीधारक बेरोजगारांना 24 महिन्यांसाठी 3000 प्रति महिना. डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दिले जातील. त्यांना 24 महिन्यांत खासगी किंवा सरकारी नोकरी मिळाल्यास ही योजना बंद होईल.
कोणतीही जात, धर्म, लिंग न पाहता सर्व बेरोजगार आणि अर्ज केलेल्यांसाठी ही योजना लागू केली जाणार आहे. ही योजना तृतीयपंथीयांनाही लागू होईल. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 180 दिवस झाले आहेत, ज्यांना नोकरी मिळत नाही ते अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात. बेरोजगार युवकांना 2 वर्षांसाठी वेतन दिले जाईल. काँग्रेसने दिलेल्या पाचही योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे.
आम्ही जे बोलतो तसे चालतो, यापूर्वी आम्ही 165 आश्वासने दिली आणि त्यापैकी 155 आश्वासने पूर्ण केली. आम्ही अजूनही आमची आश्वासने पाळतो. असे सीएम सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


Recent Comments