साखरपुडा होऊन वैवाहिक जीवन सुरु करणार असलेल्या युवकाचा गळा दाबून खून केल्याची घटना कलघटगी तालुक्यातील जिन्नूर गावात उघडकीस आली आहे.
28 वर्षीय निंगाप्पा बुडप्पा नवलुर असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या शेतातील घरामध्ये त्याच्या डोळ्यात चटणी पावडर टाकून मारेकऱ्यांनी त्याचा गळा आवळून खून करून पलायन केले.
तावरगेरे गावातील तरुणीसोबत निंगाप्पाचा साखरपुडा झाला होता. येत्या 7 तारखेला त्याचे लग्न होणार होते.
मात्र सुखी वैवाहिक जीवनाची त्याची स्वप्ने धुळीस मिळाली. काल मध्यरात्री मारेकरी त्याचा खून करून फरार झाले. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कलघटगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Recent Comments