चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळील दूधगंगा नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.
चिक्कोडी तालुक्यातील शिरगाव येथील 22 वर्षीय सागर दिनकर वाळके याचा नदीत बुडून मृत्यू झाला. सागर हा त्याच्या नातेवाईकां घरी आला होता. बुधवारी दुपारी तो काकूसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर आला होता. पोहण्यासाठी तो नदीच्या पात्रात उतरला असता बुडू लागला. हे पाहून त्याची मावशी मीनाक्षी कांबळे यांनी आरडाओरडा सुरू केला. घटनास्थळी नागरिक तातडीने जमा झाले. सुकुमार उगारे यांनी ही बाब सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदलगा अग्निशमन दलाचे जवान व बेळगाव एसडीआरएफच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र यश आले नाही. आज पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू असताना दुपारपर्यंत सागरचा मृतदेह सापडला. याप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments