Belagavi

कुत्र्यांची निर्दयी हत्या; पालिका आयुक्तांकडे तक्रार

Share

बेळगावातील हनुमाननगर श्रीराम कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांची आणि त्यांच्या पिलांची निर्दयी हत्या करण्यात येत असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

हनुमाननगर श्रीराम कॉलनी परिसरात मोजकी भटकी कुत्री व त्यांची पिल्ले असून, ती आपल्याच नादात खेळतात, बागडतात. त्यांच्यामुळे कोणाला त्रास होत नाही. असे असूनही काही उपद्रवी लोकांनी त्यांना मारून टाकले आहे.

त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी अमिता देशपांडे यांनी पालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्याकडे केली आहे.

Tags: