श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1945’ या हिंदू तिथीनुसार भव्य शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवप्रेमींच्या सळसळत्या उत्साहात साजरा करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे दीपक पवार व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून हार घालण्यात आला. फ्लो
त्यानंतर आरती म्हणून देवदर्शन यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण कीर्तनकार बाळू भक्तिकर महाराज यांच्या हस्ते पालखीत मुर्ती व ग्रंथ स्थानापन्न करण्यात आले. पालखी पूजन प्रांत प्रमुख किरणबापू गावडे यांच्या वतीने करण्यात आले. रमाकांत कोंडूसकर व नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर देवदर्शन यात्रेला सुरुवात झाली. या देवदर्शन यात्रेत प्रारंभी ध्वजपथक नंतर होनगा येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लेझीम पथक सहभागी झाले होते. सावगाव येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने यात्रेत भजन कीर्तन सादर करण्यात आले. या शोभायात्रेत बालचमू यांचे लाठी-काठी, दांडपट्टा अशा मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. श्री शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर असा शोभायात्रेचे मार्ग होता. यात अनेक धारकरी, शिवभक्त भगवे फेटे घालून उत्साहाने सहभागी झाले होते. महिला वर्गाचाही विशेष सहभाग होता. शेवटी ही देवदर्शन यात्रा कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त झाली.

कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. बाळू भक्तीकर महाराज यांच्या हस्ते कपिलेश्वर मंदिर येथे आरती करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन हिंदू तिथीनुसारच साजरा केला पाहिजे. ज्या प्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दुर्गराज रायगडावरती झाला. त्यानंतर महाराज देवदर्शनासाठी जगदीश्वराच्या मंदिराला गेले. त्याच धर्तीवर आदरणीय भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिनाच्या पूजेनंतर या देवदर्शन यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांनी दिली. कपिलेश्वर मंदिर येथे महादेवाची आरती करून ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व शिवभक्तांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी शहापूर येथे भर पावसात भगवा ध्वज खाली पडला असता पावसाची तमा न बाळगता, श्री खडकीकर नावाच्या एका लहान मुलाने तो ध्वज उचलून त्या ध्वजाचा मान राखला यावेळी त्या मुलाचा सन्मान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान बेळगावच्या वतीने करण्यात आला.

यावेळी शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, वडगाव अनगोळ विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाणाचे, गजानन निलजकर, हिरामणी मुचंडीकर, विजय कुंटे, प्रफुल्ल शिरवळकर, अभिषेक निलजकर, मारुती पाटील, गिरीश पाटील, उदित रेगे, आनंद कांबळे, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, अभिजीत अष्टेकर, शिवाजी मंडोळकर, तुकाराम पिसे, विलास चौगुले, युवराज पाटील, विनायक कोकितकर, बाळू गुरव, नागराज सावंत, मोहन जुई, परशुराम पाटील, केशव सांबरेकर, प्रतीक हेबाजी, मारुती बेळगावकर, संदीप पाटील, विनायक पाटील, शेखर पाटील तसेच सर्व तालुका प्रमुख विभाग प्रमुख व इतर शिवभक्त, महिला वर्ग तसेच बालचमु मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments