केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तसेच विविध स्तरांवर स्वतःचे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हॉकी बेळगावने मुला-मुलींसाठी मोफत हॉकी प्रशिक्षण सुभाषचंद्र बोस-लेले मैदान टिळकवाडी येथे शिबिराचे आयोजन केले होते. याचा लाभ ५० मुला-मुलींनी घेतला असे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी सांगितले.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रास्ताविकात शिबिराची माहिती सांगितली. सचिव सुधाकर चाळके यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. अध्यक्षांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण शिबिराचे प्रायोजक यश इव्हेंटसचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर व साजिद शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच हॉकीपटू प्रथमेश सावंत व युवराज ताशीलदार यांचा हॉकी व चेंडू देऊन सत्कार करण्यात आला. हॉकी बेळगांवच्या खेळाडू मृणाली भाटे, भावना कलघटगी, सीना पवार यांची १९ वर्षाखालील ज्युनियर नॅशनल कॅंप बेंगलोरसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मनोहर पाटील, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, एस एस नागरोटे, प्रशांत मंकाळे, श्रीकांत आजगांवकर, उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, अश्विनी बस्तवाडकर, दत्तात्रय जाधव, सुरेश पोटे, विकास कलघटगी, अनिल राणे, अजय सातेरी आदी उपस्थित होते.
Recent Comments