Athani

शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

Share

अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व “मोती” व जरीपटक्याचा अश्व “हिरा” या  मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास सुरवात करण्यात आली.

अंकली येथील शितोळे घराण्याकडे 190 वर्षापासून माऊलीच्या अश्‍वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार  आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्‍व अंकलीहुन पंढरपूरकडे प्रस्थान करतात. हैबतबाबा आरफळकर यांनी आषाढीवारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्त्व मिळवून दिले. यावेळी माऊलीच्या अश्वाचा व माऊलीच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. पिढ्या-दर-पिढ्या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार हे निष्ठेने चालवत आहेत.


अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात सकाळी १० वाजता अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन  करण्यात आले. दिंडी व  दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी  पाणी घालून ओवाळणी केली व दर्शन घेतले. गावातील पारंपारीक मार्गावरून  ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला. फ्लो
याप्रसंगी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुळूंजकर आळंदीकर, माऊली शेट चव्हाण जेजूरी,  गणेश चव्हाण, सत्यवान बवले, संतोष पवार, विठठ्ल पाटील, अशोक माळी पंढरपूर, उद्योजक कार्लेकर दांपत्य, केदार सटाले, योगेश गोंधळी, अश्वत शितोळे, अतूल नाझरे यांच्यासह तुकाराम पाटील, ग्रामविकास अधिकारी विनोद असोदे, सचिव पद्मना कुंभार, संतोष भंडारे यांच्यासह अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडी, काडापूर, परिसरातील वारकरी उपस्थित होते.
शितोळे घराण्याकडे 190 वर्षापासून वारीतील अश्वाचा मान आहे हे सर्वांना माहीत आहे मात्र वारीला संरक्षण देणे ही मूळ परंपरा शितोळे घराण्याकडून पार पाडली जाते. वारी काळातील तंबूचा मान वाखरीऊन माऊलींच्या पादुका हातात घेऊन जाण्याचा मान किंवा नैवेद्याचा मान या प्रथा परंपरा आजही निष्ठेने चालू आहेत. अश्व आळंदीहून निघाल्यानंतर विविध रिंगण सोहळे नियोजनबद्ध रित्या पार पडणार आहेत अशी माहिती श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांनी दिली.

Tags: