खानापूर तालुक्यातील बिडी-हल्याळ मार्गावर गोल्याळीजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले.


कडतनबागेवाडी गावातील दुचाकीस्वार व बस यांच्यात बिडी-हल्याळ मार्गावरील गोल्याळीजवळ भीषण अपघात झाला. शिरसी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात एक ठार तर तीनजण जखमी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दुचाकीवर चारजण स्वार होते. दुचाकीवरून प्रवास करणारे यल्लाप्पा प्रकाश वणूर, पल्लवी भीमप्पा वणूर, भीमाप्पा बसाप्पा वणूर हे गंभीर जखमी झाले असून जखमींना खानापूरच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.


Recent Comments