सध्याच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली आहेत. परंतु पेरणी सुकर करण्यासाठी पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन चिक्कोडी जिल्हा कृषी उपसंचालक एल. वाय. रोडगी यांनी उगार येथे शेतकऱ्यांना केले.


कागवाडचे आमदार राजू कागे यांच्या हस्ते उगार येथे गुरुवारी कागवाड तालुका स्तरावरील सर्व क्षेत्रांचा समावेश असलेल्या कृषी विभागाच्या वतीने सवलतीच्या दरात उडीद बियाण्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी बोलताना कृषी उपसंचालक एल.वाय. रोडगी यांनी, बेळगाव जिल्ह्यात उडीद, मूग, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी पिकांची पेरणी करण्यासाठी आम्ही सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रात पिके घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये ३५ शेतकरी संपर्क केंद्र आणि १३६ अतिरिक्त केंद्रांवर ४७ हजार क्विंटल बियाणे खरेदी करून, तसेच १ लाख ३५ हजार टन खत खरेदी करून विविध केंद्रांवर साठा राज्य शासनाच्या सूचनेनुसार करण्यात आला आहे. कागवाड तालुक्यातील सर्व शेतकरी संपर्क केंद्रांवर बियाणे व खतांची व्यवस्था करण्यात आली असून सवलतीच्या दरात बियाणांची विक्री सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
कागवाडचे आमदार राजू कागे यांनी उगारच्या प्राथमिक कृषी सहकारी संस्थेत सवलतीच्या दरात बियाणे विक्री केंद्र सुरू केले असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही यंत्रणा देण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
पावसाळा सुरू झाला आहे. परंतु कागवाड व अथणी तालुक्यातील सहाय्यक कृषी संचालक निंगाप्पा बिरादार व कांतीनाथ बिरादार यांनी तुरळक पावसामुळे पेरणीसाठी योग्य पद्धत असल्यास पेरणी करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
यावेळी कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे यांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
प्राथमिक कृषी अधिकारी दिलीप हुल्लोळी, तुकाराम थोरसे, संगप्पा कटगेरी, भीमू बस्तवाडे, विजय थोरसे, विलास राजमाने, सतीश जगताप, विजय आसुडे, सहाय्यक कृषी अधिकारी महांतेश नरगट्टी, शिवपुत्रप्पा गुंजेगावी, रविकुमार देवरे पाटील, प्रवीणकुमार बंगरे, प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, पीकेपीएसचे सचिव शांतगौडा पाटील, चंद्रकांत कांबळे, राजीव पवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments