पाणी हे जीवन आहे. अन्नापेक्षा पाणी महत्त्वाचे आहे. पाण्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे असे चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे अल्लमप्रभू स्वामीजी यांनी सांगितले.


चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मल्लिकार्जुन कोरे उपस्थित होते. तत्पूर्वी, कृष्णा नदीतून मंगल कलशाच्या मिरवणुकीने सुवाशिणींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. ग्रामपंचायत अध्यक्षा शैलजा पाटील व त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला.

स्वामीजींनी कुदळ पूजन करून कार्यास सुरुवात केली. यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हर घर जल जीवन अभियानाचा दुसरा टप्पा अंकली गावात राबविण्यात येत असून, यामध्ये पाच किलोमीटरची पाइपलाइन, एक लाख लिटरची ओव्हरहेड टाकी, अ. 50 हजार लिटरची टाकी, जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईप टाकण्याचे काम राबविण्यात येत असून प्रत्येक घरात शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाइट:
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा शैलजा पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष आण्णाप्पा हारके, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, विकास पाटील, विवेक कमते, अजित उमराणी, चिदानंद कुरे, अल्लाबक्ष पटवेगार, शीला हलवाई, संतोषी बुबनाळे, अनुसया माने, लता बुबनाळे, जयश्री कोळी, संजू चौधरी, पापू किलिकत, पीडीओ विनोद असोदे, सचिव पद्मन्ना कुंबार आदी उपस्थित होते.


Recent Comments