भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


बेळगावातील समादेवी मंदिर मंगल कार्यालयात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर खासदार श्रीमती मंगल अंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दिवंगत सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम त्यांच्या आत्म्याला चिरशांती देईल, असे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रसाद देवरमनी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज आयोजित रक्तदान शिबिरात भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते स्वेच्छेने येऊन रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते.

स्व.सुरेश अंगडी यांचे मार्गदर्शन व त्यांनी घालून दिलेला मार्ग हेच आज रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे प्रेरणास्थान आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि कोमल मनाचे व्यक्तिमत्व भाजप कार्यकर्त्यांमध्ये रुजले आहे. या कार्यक्रमात 50 हून अधिक जणांनी रक्तदान करून सहभाग घेतला आहे असे त्यांनी सांगितले. बाइट+बाइट.
खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते यापुढे रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या तरुणांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद देवरमणी, कोषाध्यक्ष अनिकेत धर्मदासानी, युवा मोर्चा सचिव सौरभ सावंत, उत्तर मंडळ अध्यक्ष विजय कोडगनूर आदी उपस्थित होते.


Recent Comments