Accident

बी. एस. चन्नबसप्पा मॉलतर्फे हेल्मेट जागृतीसाठी बाईक रॅली

Share

बी. एस. चन्नबसप्पा द टेक्सटाईल मॉलतर्फे दुचाकीचालकांत हेल्मेट जागृतीसाठी बेळगावात आज भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यानिमित्त शहरातील विविध मार्गांवरून हेल्मेटसह दुचाकी चालवून वाहनचालकांत हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.


नाविन्यपूर्ण वस्त्रप्रावरणांची बेळगावातील भव्य शोरूम बी. एस. चन्नबसप्पा द टेक्सटाईल मॉलतर्फे अनोख्या पद्धतीने हेल्मेट वापरासंदर्भात बेळगावात आज जनजागृती करण्यात आली. टिळकवाडीतील गोवावेस येथील मॉलपासून आज सकाळी हेल्मेट जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीचे उदघाटन करताना बी. एस. चन्नबसप्पा द टेक्सटाईल मॉलचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. एस. मृणाल म्हणाले की, वाहन चालविताना अपघात होण्याची शक्यता असतेच असते. अपघातात शरीराच्या अन्य कोणत्याही भागाला दुखापत झाली तर उपचार, विश्रांती घेऊन बरे होता येते. मात्र डोक्याला मार लागल्यास गंभीर दुखापत होऊन व्यक्ती कोमात जाणे, त्याला अर्धांगवायू होणे किंवा त्याचा जीव जाणे इतपत मोठे नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने दुचाकी चालविताना सक्तीने हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. यादृष्टीने दुचाकीचालकांत हेल्मेट वापरासंदर्भात जागृती करण्यासाठी आम्ही बाईक रॅली काढत आहोत.


यावेळी वाहतूक विभागाचे एएसआय सारापुरे, अन्नीगेरी, बीएससी मॉलचे मार्केटिंग मॅनेजर इरण्णा शिवशेट्टी, स्टोअर मॅनेजर अमजद जमादार आदींच्या उपस्थितीत बाईक रॅलीला मार्गस्थ करण्यात आले. हेल्मेट वापराबाबत जनजागृतीचा संदेश देणारे फलक हाती धरून बीएससीच्या कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला. फ्लो
गोवावेस येथील मॉलपासून निघालेली ही रॅली पहिले रेल्वे गेट, तिसरे रेल्वे गेट, गोवावेस, नाथ पै चौक, शहापूर खडेबाजार, ओल्ड पी. बी. रोड, सीबीटी, अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, कोल्हापूर सर्कल, केएलई हॉस्पिटल रोड, चन्नम्मा चौक, काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, खानापूर रोड, गोगटे सर्कल आदी मार्गांवर फिरून बीएससी मॉलकडे समाप्त झाली.
एकंदर, बेळगावकरांमध्ये बीएससी द टेक्सटाईल मॉलच्या या रॅलीने हेल्मेट वापरासंदर्भात चांगलीच जनजागृती केली.

Tags: