बेळगावातील चेन्नम्मानगरातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात वनिता विकास मंडळाच्या सदस्यांनी मुलांसाठी 10 दिवसीय संस्कार शिबिर घेण्यात आले.
7 ते 12 वर्षे वयोगटातील मुले यामध्ये सहभागी झाली होती. त्यांना श्लोक, प्रार्थना, महाभारतातील कथा, देशभक्तीपर गीते, नृत्यगीते शिकवण्यात आली. मुलांना सीडी कव्हर, शिवलिंग, रबर कव्हर, फ्लॉवर पॉट आदी साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
मुलांनी त्यात खूप स्वारस्य घेऊन आनंदाने चांगले साहित्य तयार केले. शिबिराच्या अखेरच्या दिवशी पालकांच्या उपस्थितीत मुलांनी शानदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

मंदिराचे प्रमुख व राधिका मिर्जी यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. मंडळाच्या सदस्या शांता हेगडे, शैला, माया, प्रभा, ज्योती, विद्या यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


Recent Comments