धारवाडमधील रिअल इस्टेट व्यावसायिक महमूद कुडची यांच्या हत्येतील आरोपींना आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायालयाने सहा आरोपींना पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मालमत्तेच्या वादातून अरबाज हंचीनाळ, अल्लाउद्दीन रजब अली, अजय मदली, आबिद चतरकी, आबिद चित्तेवाले, साहिल नदाफ आणि गणेश कममारा यांनी कुडची याची निर्घृणपणे हत्या केली होती.
महमूद कुडची याच्या हत्येदरम्यान या प्रकरणातील सातवा आरोपी गणेश याच्या पायाला जबर मार लागला होता. त्याचाही या दरम्यान मृत्यू झाला. या खूनप्रकरणी धारवाड उपनगर पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायालयाने सहा आरोपींना पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


Recent Comments