Belagavi

एक्कनची गावात तरुणाचा मृतदेह संशयास्पद मृत्यू

Share

एका तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील एक्कनची गावात घडली आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

28 वर्षीय शिवाप्पा बाबू किवडी या तरुणाचा मृतदेह बागेतील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आत्महत्या केलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

ही घटना ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

Tags: