Belagavi

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे पवन कत्ती यांचे आवाहन

Share

बेल्लद बागेवाडी येथील एसएमव्ही ट्रस्टतर्फे येत्या शनिवारी बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हुक्केरी तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष पवन कत्ती यांनी केले.


हुक्केरीमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन कत्ती यांनी सांगितले की, एसएमव्ही ट्रस्टतर्फे येत्या शनिवारी व्ही. एम. कत्ती आयटीआय कॉलेज, बेल्लद बागेवाडी आणि ग्लोबल एचआर कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या वतीने एसएसएलसी, पीयूसी, आयटीआय आणि डिप्लोमा पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. बेल्लद बागेवाडी येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यात हुक्केरी व परिसरातील तरुणांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

यावेळी व्ही.एम.कत्ती आयटीआय कॉलेजचे प्राचार्य व्ही. डी. तोरे, प्री-ग्रॅज्युएट कॉलेजचे प्राचार्य एस. एम. भंगी, रमेश कुलकर्णी, प्रसाद खाडे आदी उपस्थित होते.

Tags: