बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील भावीहाळ गावामध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ते एकमेकांना लाठीमार करत असल्याचे दृश्य व्हायरल झाले आहे.
भावीहाळ गावात 23 मे रोजी दोन कुटुंबात जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. महारुद्रप्पा कुंबार आणि शंकरप्पा कुंबार कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचा वाद सुरु आहे. त्यामुळे शंकरप्पा कुंबार न्यायालयाची पायरी चढले आहेत. शेतात उगवलेली सागवानाची झाडे तोडण्यात आल्यावरून या दोन कुटुंबात भांडण झाले.
तोडलेली सागवानाची झाडे घेऊन नेण्यावरून एकच गोंधळ उडाला आणि दोन कुटुंबात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बैलहोंगल तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments