बेळगावजवळील बामणवाडी येथील श्री शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजनाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.

बेळगाव शहरातील आराधना संस्थेचे अध्यक्ष सुनील चौगुले यांनी पुढाकार घेऊन स्वामी समर्थांचे वंशज श्री श्री निलेश महाराज आणि त्यांच्याबरोबर इतर महाराज उपस्थित होते. शांताई वृद्धाश्रमा जवळ असलेल्या परिसरातील, बामणवाडी व कुट्टलवाडी या भागातील वारकरी मंडळींनी टाळाच्या गजरामध्ये पादुकांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे पुजन (अभिषेक) यतीन कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर शांताई वृद्धाश्रमामध्ये एक तास भजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी बेळगाव शहरातून सुनील आपटेकर, सिद्धार्थ उंद्रे, संतोष ममदापूर, वसंत बालिगा व अरुण पोटे आणि स्वामी समर्थ भक्तमंडळी,
हितचिंतक उपस्थित होते, सर्वांनी पादुकाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वालवालकर, अरुण पोटे, सौ मारिया मोरे, आलन मोरे व दत्ता घोरपडे आणि इतर मंडळींनी परिश्रम घेतले. शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी आभार मानले.


Recent Comments