DEVELOPMENT WORK

हुबळीत दहा लाखांहून अधिक किमतीचे साहित्य गायब : सरकारी मालमत्तेला अजिबात सुरक्षा नाही..!

Share

हुबळी-धारवाड, जुळ्या शहरांमध्ये सरकारी मालमत्ता, साहित्य किती असुरक्षित आहेत हे समोर आले आहे. महापालिकेच्या साहित्यावर कुणी आरामात घर बांधतो. तर कोणी विकसित केलेल्या जागेवरील साहित्य राजरोस चोरून नेतो. मात्र, महापालिका आणि स्टार्टसिटीच्या अधिकाऱ्यांना त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते मूग गिळून गप्प आहेत. मग नेमकी का आहे ही कथा? याचा संपूर्ण तपशील पहा …


वाणिज्य नगरी हुबळी येथील गोकुळ रोडवरील मुख्य नाल्याला लागून असलेल्या महापालिकेच्या जागेत रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी तात्पुरते मार्केट बांधण्यासाठी साठवण्यात आलेले लाखो रुपयांचे साहित्य गायब झाल्याचे आढळून आले आहे.


होय.. नाला लपवून त्यावर तात्पुरता बाजाराचे स्टॉल उभारण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शेकडो पत्रे आणि स्टॉलसाठीचे लोखंडी साहित्य साठवण्यात आले होते. 2020 पासून असलेलं हे साहित्य चोरीला गेल्याच्या चर्चा महापालिकेत सुरु आहेत.महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मते, 10 लाखांहून अधिक किमतीच्या वस्तू चोरीस गेल्याचा अंदाज आहे. सध्या नाल्याचा विकास सुरू असून, बाजारपेठेत मातीचा ढिगारा टाकण्यात आल्याचे दिसून आले. नोव्हेंबर 2020 मध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 18 कोटी रु. जनता बाजार हा किमतीत स्मार्ट मार्केट बनविण्याच्या नादात व्यापाऱ्यांना बेदखल करण्यात आले. होसूरजवळ पर्यायी जागा देण्यात आली होती. मात्र आता यासाठीचे साहित्यच अचानक गायब झाल्याने या प्रकरणाला चोरीचा वास येत आहे.


हुबळी-धारवाड, या जुळ्या शहरात सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेला अजिबात सुरक्षा नाही. महापालिकेत जे होईल ते होईल, अशा मानसिकतेतून अशा घटना वारंवार घडत आहेत. जिल्हा प्रशासनाने योग्य तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

Tags: