Banglore

काँग्रेसकडून पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे काम : माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

काँग्रेसकडून पोलिस खात्याचे मनोधैर्य खच्चीकरणाचे काम सुरु असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
बंगळुरूमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल झालेल्या बैठकीत पोलिसांना इशारा दिला.

भगवेकरण करू न देण्याचा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे. कर्नाटक पोलिसांनी संपूर्ण देशात चांगल्या कामासाठी नाव कमावले आहे. आमच्या पोलिसांनी कधीच भगवेकरण केलेले नाही असे बोम्मई म्हणाले.

काँग्रेस पहिल्या दिवसापासून राज्यात तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. अशा प्रकारे काँग्रेसने त्यांचा अजेंडा राबविण्याचे ठरवले आहे. यामुळे पोलिस खात्याचे मनोधैर्य खचले आहे असा आरोप बोम्मई यांनी केला

Tags: