Accident

ऑटोनगरात हायव्होल्टेज वीज वाहिनीवर पडले झाड

Share

बेळगावातील ऑटोनगरातील आरटीओ ड्रायव्हिंग टेस्ट ग्राऊंडजवळ हायव्होल्टेज वीज वाहिनीवर पडलेले झाड हटविण्यात दोन दिवसांनंतरही हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धिक निर्माण झाला आहे.


सोमवारी रात्री मुसळधार वारा आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले, मात्र ते हटविण्याचे काम अद्याप झालेले नाही. ऑटो नगरच्या आरटीओ ड्रायव्हिंग टेस्ट ग्राऊंडजवळ हाय व्होल्टेज पॉवर लाईनवर एक मोठं झाड पडलं. या रस्त्यावरून दररोज शेकडो लोकांची ये-जा असते. ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी अनेक युवक-युवती व महिला टेस्ट देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येतात. अशात हेस्कॉमने कळवूनदेखील वीजवाहिनीवर पडलेले झाड न हटवल्याने लोक आणि वाहनधारक भीतीच्या वातावरणात चालत आहेत.


या संदर्भात आपली मराठीसोबत बोलताना स्थानिकांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पाऊस व वाऱ्यामुळे ही घटना घडली आहे. उच्च दाबाच्या वीजवाहिनीवर झाड कोसळल्याने वीजप्रवाह बंद करून तातडीने झाड हटविणे गरजेचे आहे. मात्र आम्ही याबाबत वारंवार कळवूनदेखील हेस्कॉम अधिकारी दखल घेत नाहीत. अनेकदा याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता संपर्क होत नाही. उद्या वीजप्रवाह संचरित होऊन एखादी दुर्घटना घडल्यावरच हेस्कॉम जागे होणार का असा सवाल करून तातडीने झाड हटवण्याची मागणी त्यांनी केली. बाईट + बाईट

Tags: