Accident

शहापूर स्मशानभूमीतील पत्रे री फिटींग करून देणार : नगरसेवक नितीन जाधव

Share

जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावरील पत्रे री फिटींग करून देण्यात येतील असे आश्वासन नगरसेवक नितीन जाधव यांनी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


येथील शहापूर स्मशानभूमीमधील अंत्यविधी चौथऱ्यावरील पत्रे पावसाने उडून गेले होते. त्याची माहिती स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांनी नगरसेवक नितीन जाधव यांना दिली. त्यानंतर नगरसेवक जाधव यांनी त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली. लवकरात लवकर पत्रे री फिटींग करून देतो असे त्यांनी सांगितले. त्या बद्दल कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले या वेळी श्रीकांत यल्लाळ, आकाश छत्रे, प्रज्वल शेत्तपनावर, शुभम जांबोटकर, साई खनगावकर आदी उपस्थित होते.

Tags: