Belagavi

उत्तर कर्नाटकात पाणी समस्या निवारणासाठी योग्य ती कार्यवाही : प्रादेशिक आयुक्त हिरेमठ

Share

उत्तर कर्नाटकातील पाण्याच्या समस्येवर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

बेळगावात आज इन न्यूज-आपली मराठीशी बोलताना, बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ म्हणाले की, उत्तर कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने ती सोडण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्यात मलप्रभा जलाशयात 8.1 टीएमसी पाणीसाठा होता, आता तो 5.6 टीएमसी आहे. हिप्परगी जलाशयात 1.2 टीएमसी पाणीसाठा होता, तो आता 1.06 टीएमसी इतका आहे. आलमट्टी जलाशयात 2.3 टीएमसी होता आणि आता 5.1 टीएमसी नोंद झाली आहे.

पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सर्व अभियंते आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे ते म्हणाले.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजमधून महाराष्ट्र सरकारला विनंती करून 1 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. कालपासून सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची समस्या कमी होऊ शकते, असे ते म्हणाले.

Tags: