Banglore

बीबीएमपी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू : बसवराज बोम्मई

Share

बेंगळुरू शहरात काही तासांच्या पावसामुळे एका तरुणीचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असून, हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही बीबीएमपीने यंदा खबरदारीच्या उपाययोजना केल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.

बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले की, बीबीएमपी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. बीबीएमपीने अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केली नसल्याचा आरोप बोम्मई यांनी केला.

आम्ही बंगळुरूमध्ये एसडीआरएफ टीम तयार केल्या होत्या. त्यांना मोहीम देऊन कामाला लावले पाहिजे होते. आणखी पाच दिवस पाऊस पडेल, असा अंदाज आहे. पद्धतशीर उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी झाडे पडली आहेत. पडलेली झाडे हटविण्याचे कोणतेही काम झालेले नाही. पुढील पाच दिवस असेच सुरू राहिल्यास बंगळुरूमध्ये प्रचंड गोंधळ उडेल. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना कराव्यात. बीबीएमपीचे अधिकारी काम करत नाहीत. योजनेनुसार, सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक आहे असे बोम्मई यांनी सांगितले.

एकंदर, पावसामुळे उडालेल्या हाहाकारात झालेल्या तरुणीच्या मृत्यूला बीबीएमपी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला आहे.

Tags: